Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील माकणी येथे आय सीड संस्थेच्या वतीने वीज साक्षरता व आकाश कंदील बनवणे कार्यशाळा संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना देणे व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा उद्देश ठेवून आय सिड संस्थेने माकणी येथे \’वीज साक्षरता\’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळेचे आयोजन केले होते. \’आकाश कंदील बनवणे कार्यशाळेचे\’ साधन व्यक्ती संस्थेचे संस्थापक विष्णू शिंदे हे होते. विविध कल्पक प्रयोग करून विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवले व यावर्षीही पैशाची बचत केली.
\’वीज साक्षरता\’ कार्यशाळेकरिता साधनव्यक्ती म्हणून पुणे येथील नामांकित महाविद्यालयातुन इलेक्ट्रॉनिक अभियंता पदवी प्राप्त व एस ब्रो क्रियेशन कंपनीचे संचालक शुभम उबाळे तसेच त्यांचे सहकारी पूजा गुरुस्थळे, मोलश्री फुलझेले, शुभम शिंदे हे होते. त्यांनी विविध प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना वीज निर्मिती, वीज बचत, विजेपासून स्वतःचे संरक्षण, विजेपासुन होणारे आविष्कार तसेच त्यांनी तयार केलेले रोबोट, सोलार पॅनेल, सेन्सर मशीन इ. माहीती दिली. सदर कार्यशाळा मुलांसाठी नवीन मेजवानीच होती. मुलांनी तब्बल तीन तास याचा आनंद लुटला.\"\"या कार्यशाळेसाठी आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, स्पेरुल फाउंडेशन पुणेचे कन्ट्री हेड व डी. के. हेल्थकेअरचे संस्थापक दयानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोणतेही यश कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे केवळ चमकणाऱ्या तात्काळ गोष्टीकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांनी कष्ट करावे असे प्रतिपादन दयानंद पाटील यांनी केले. तसेच आय सिड संस्थेचे अभिनंदन केले. आय सीड संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी या प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करणे म्हणजे या विद्यार्थ्यांना दिवाळीची मौल्यवान भेटच आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचं भविष्य खूप उज्वल असणार आहे हे मात्र नक्की असे प्रतिपादन गौरीशंकर कलशेट्टी यांनी केले. संस्थेची विद्यार्थीनी लक्ष्मी शिंदे हिने सूत्रसंचालन केले. शकील सय्यद, दिग्विजय कांबळे, अमोल रसाळ, रोहित वाघमारे आदी उपस्थित होते. आय सीडचे कार्यकारी संचालक महेश शिंदे यांनी कार्यशाळेचा समारोप केला.
आय सीड संस्था माकणी येथे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थी सद्यस्थित शाळाबाह्य होऊ नये याकरिता सर्वसमावेशक व सर्वांगीण शैक्षणिक विकासाची कामे लोकसहभागातून करत आहे. याकरिता संस्थेने अनेक शाश्वत उपक्रम हाती घेतले आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेऊन मोफत अभ्यासावर्ग, विविध शिबिरे व सत्रांचे तसेच मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य सदृढ राहावे याकरिता क्रीडा प्रकारांची आयोजन करत आहेत.

Ad 2
Ad 1
Tags: आय सिड
Previous Post

उद्योजक तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रदीप (भाऊ) चव्हाण यांची भातागळी गावास भेट

Next Post

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यश मोहितेचा सत्कार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यश मोहितेचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!