वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्य सरकारच्या विकेल ते पिकेल या योजनांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचा लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे बुधवारी (दि.१७) शुभारंभ करण्यात आला .शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचविणे हा उद्देश या योजनेचा आहे. या शुभारंभ प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब बिराजदार, सास्तूर सज्जाचे कृषी सहाय्यक दिपक जाधव, तालुका तंत्रज्ञ के. के. पवार, जी.एम. बिराजदार, एन. बी. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांना मिळण्यास मदत होणार आहे.