Monday, October 12, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील हराळी येथे समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रामध्ये आदर्श प्रभागसंघ विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत समुदाय संचलित सनियंत्रीत, स्वायत्त व आर्थिकदृष्ट्या स्वायत्त व शाश्वत प्रशिक्षण संस्था विकसीत करण्यात येत आहेत. याकरिता उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या नवप्रभा महिला प्रभागसंघ, जेवळी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन ज्ञान प्रबोधिनी हराळी येथे शुक्रवारी (दि. २४) पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे व गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे म्हणाले की, महाराष्ट्रात १५ जिल्ह्यात समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून सदरील प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनीही महिलांनी विविध प्रशिक्षण घेऊन कौशल्य वाढवून यामधून आपल्या कुटुंबाचा विकास करावा असे आवाहन केले. पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे यांनी महिलांच्या अडचणी असल्यास पंचायत समिती लोहारा येथे संपर्क करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व प्रभागसंघ व ग्रामसंघांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, समाधान जोगदंड, ज्ञान प्रबोधिनीच्या श्रुती पाठक, सचिन सुर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप चव्हाण यांनी केले तर आभार अलंकार बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तालुका अभियान कक्षातील अमोल कासार, प्रणिता कटकदौंड, नरेंद्र गवळी, अविनाश चव्हाण, प्रीतम बनसोडे, शिवशंकर कांबळे, अंतेश्वर माळी व प्रभागातील समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभागसंघ व्यवस्थापक आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प ८४ टक्के भरला – कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना अतिदक्षतेचा ईशारा

Next Post

महिलांनी सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेणे गरजेचे – आकांक्षा ज्ञानराज चौगुले – शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचेबक्षिस वितरण संपन्न

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

महिलांनी सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेणे गरजेचे - आकांक्षा ज्ञानराज चौगुले - शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचेबक्षिस वितरण संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!