दुष्काळी परिस्थिती असताना माणूस स्वतःच्या पाण्याची सोय करू शकतो पण वनस्पती, पक्षी व प्राणी काय सोय करू शकत नाहीत. याचा विचार करून लोहारा तालुक्यातील करवंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातुन वनस्पतींना व पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सोय केले आहे.
दुष्काळाच्या परिस्थितीत रोपे करपुन चालली आहेत, पक्ष्यांचा घसा कोरडा पडुन मृत्यू पावत आहेत. या परिस्थितीचा विचार करून टाकाऊ बाटल्यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी टिकाऊ असे साहित्य तयार केले आहेत. बाटल्यांना छिद्रे पाडून थेंब थेंब पाणी वनस्पतींच्या मुळांना देण्यात येत आहे. एक लीटर पाण्यात किमान एक वनस्पती दहा दिवस जगु शकतात असे नियोजन केले आहे. त्यामुळे आता ते वनस्पती हिरवीगार आहेत. त्याचं बरोबर पक्ष्यांना देखील बाटल्यांपासुन पाण्याची सोय करण्यात आली आहे.

बाटल्यांना योग्य आकार देऊन ते शाळा व घराच्या परिसरातील झाडांना लटकवण्यात आले आहेत. कार्यानुभवातुन दिवाळी निमित्त आकाश कंदील, भेटकार्ड ही विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. यावेळी शाळेतील शिक्षक एस. के. चिनगुंडे, जी. एस. कांबळे, एस. टी. पवार, मुख्याध्यापक एन. एम. बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिगंबर हाक्के व गावातील पालकांनी या समाजाभिमुख उपक्रमाबद्दल कौतुक केले.






