Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील होळी येथे वाचन संस्कृती जागरण पंधरवडा अंतर्गत ग्रंथदिंडी – विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुस्तक वाटप तसेच बक्षिस वितरण संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालय व ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशन यांच्या वतीने दि.१५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान वाचन संस्कृती जागरण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यातील उपक्रमांचा भाग म्हणून बुधवारी (दि. १९) लोहारा तालुक्यातील होळी या गावातून ग्रंथदिंडी फिरवण्यात आली.\"\"या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून गावकऱ्यांना वाचनाचे महत्व पटवून देत जागृती निर्माण करण्यात आली. तालुक्यातील होळी येथील स्वामी विवेकानंद भवन, ग्रामपंचायत कार्यालय, विट्ठल-रुक्मिणी मंदिर, आण्णाभाऊ साठे चौक, आण्णाभाऊ सांस्कृतिक भवन या मार्गे विद्यार्थी व नागरीकांच्या उपस्थितीत ही ग्रंथदिंडी फिरवण्यात आली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयात ग्रंथदिंडीला विश्राम देवून उपस्थित समूदायाला वाचन संस्कृती रुजवण्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ओम बिराजदार हे होते. यावेळी प्रमोद माने, शिक्षक करण बाबळसुरे यांनी उपस्थित विद्यार्थी व गावकऱ्यांना भक्कम समाज बांधणीसाठी वाचन कसे महत्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर पंधरवड्यातील उपक्रमांतर्गत उमरगा शहरातून काढलेल्या पुस्तक पालखीत जमलेली पुस्तके होळी येथील वाचनालयाला देण्यात आली. ही पुस्तके वाचनालयाच्या नोंदवहीत नोंदवून वाचकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत असेही सांगण्यात आले. त्याचबरोबर वाचनालयामार्फत यापूर्वी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रत्येकी रु.१०१/- चे मानधनपर बक्षिसही देण्यात आले.\"\"वाचनालय व फाऊंडेशनच्या वाचन संस्कृती रुजवण्यासाठीच्या धडपडीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, केशव सरवदे, व्यंकट जाधव व कृष्णा सरवदे यांनी परिश्रम घेतले. होळीनंतर काळ निंबाळा, कदमापूर, कोळसूर, बेट जवळगा, सालेगाव, आनंदनगर आणि कानेगाव याठिकाणी पंधरवड्यातील पुढील कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव यांनी यावेळी दिली.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी ८७.४६ टक्के मतदान – १७३१ पैकी १५१४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क – आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार

Next Post

लोहारा तालुक्यात गुरुवारी १७ रुग्णांची भर – लोहारा शहरातील ९ जणांचा समावेश – नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यात गुरुवारी १७ रुग्णांची भर - लोहारा शहरातील ९ जणांचा समावेश - नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!