लोहारा –
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये गुरुवारी (दि.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. व्यंकट चिकटे, प्रा.अनिल तुंगे, प्रा. राजपाल वाघमारे, प्रा. राजाराम निकम, नवनाथ वकील, अरविंद हंगरगेकर, अमर कीर्तने, बालाजी जगताप, गणेश गरड , दादा साठे आदी उपस्थित होते.