Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न – मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावीतील गुणवंतांचा झाला सत्कार

admin by admin
02/07/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (दि.१) दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नीट, जेईई, सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, प्राचार्या यु. व्ही. पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, प्राचार्या यु. व्ही. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अभिषेक जगताप व मारुती माने या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे, लोहारा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटील, मनोज पाटील, नगरसेवक प्रशांत काळे, आमीन सुंबेकर, विजयकुमार ढगे, जालिंदर कोकणे यांच्यासह श्रीकांत भरारे, प्रमोद बंगले, के .डी. पाटील, दीपक रोडगे, आयुब शेख, ओम कोरे, गजानन मक्तेदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील बहिरे यांनी तर श्रीकांत मोरे यांनी आभार मानले. यावेळी शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालय,ववसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

लोहारा
———-
या विद्यार्थ्यांचा झाला सत्कार

दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी –
श्रावणी सूर्यवंशी, आरती खंडाळे, गीता सूर्यवंशी,

बारावी वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थी –
वैभव बोकडे, दिपाली माळवदकर, अपर्णा सूर्यवंशी

बारावी विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी –
अभिषेक जगताप, रसिका बनकर, संध्या केदार

बारावी कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी –
तमीर हेड्डे, द्वितीय सोनाली काटे, अविष्कार पांढरे, गायत्री सूर्यवंशी

नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी –
अभिषेक जगताप,

जेईई परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी –
रसिका रामलिंग बनकर

एमएचटी – सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी –
श्रद्धा गोरे, प्रज्योत माळवदकर, प्रजेश लिमये,

सहाय्यक विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थी मारुती माने यांचाही सत्कार करण्यात आला.
———
यावेळी प्राध्यापक प्रशांत काळे सर यांनी कै. गणपतराव काळे यांच्या स्मरणार्थ बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 1001 रुपये व 501 रुपयाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. प्रा. विद्यासागर गिरी यांनी मराठी विषय प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 1001 रुपयाचे पारितोषिक कै. मुरलीधर महाराज यांच्या स्मरणार्थ दिले. तसेच दहावी विज्ञान विषयक प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राचार्य यु व्ही पाटील मॅडम यांनी 1001 रुपयाचे पारितोषिक दिले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयलोहारावसंतदादा पाटील हायस्कुल
Previous Post

अखिल भारतीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा स्पर्धेत भातागळीच्या श्रेया जगताप, रिया चव्हाण यांचे यश

Next Post

जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's