वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे.
सभागृहात विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भावावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्रमक पवित्रा घेत म्हणाले की, मी साधा प्रश्न विचारला होता, पालघर आरोग्य यंत्रणेमुळे किती अधिकारी आणि किती कर्मचारी आत्ता काम करत आहेत. आणि त्यापैकी किती पदे रिक्त आहेत. आणि तिथे किती निधी दिला आणि त्यापैकी खर्च किती झाला असे साधे प्रश्न विचारलेत. तिथं पालघर मध्ये आदिवासींची काय अवस्था आहे. आणि इथं साधं उत्तर मिळत नाही अशी संतप्त भावना व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देण्यासाठी सांगितले. यावर तानाजी सावंत यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. याबाबतीत मी तासाभरात माहिती देतो असे तानाजी सावंत यांनी सभागृहात सांगितले.