वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे पारित केले आहेत. या कायद्याला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. तीनही कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्ली येथे तीन महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. परंतु केंद्र सरकार याची दखल घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जाचक कायदे हे सर्व भारतीयांच्या विरोधात आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. तरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हे तिन्ही कायदे तत्काळ रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश घोडके, तालुकाध्यक्ष रविकिरण बनसोडे, विष्णू वाघमारे, मनोज थोरात, सर्जेराव बनसोडे, नितीन सितापुरे, श्रीधर माने, प्रवीण लोंढे, रितेश वाघमारे, रमेश वाघमारे, श्रीकांत कांबळे आदी सहभागी झाले होते.