वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी लोहारा तालुक्यातील जेवळीचे सरपंच मोहन पनुरे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत शनिवारी (दि.२२) पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र च्या वतीने उस्मानाबाद जिल्हा समन्वयकाच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यात समन्वयकपदी लोहारा तालुक्यातील जेवळीचे सरपंच मोहन पनुरे यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या समन्वयकांनी नवीन सभासद करून घ्यावे व तालुकास्तरावर समन्वयकांच्या निवडी कराव्यात असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते, महिला अध्यक्षा राणीताई पाटील, प्रदेश सरचिटणीस विकास जाधव आदींच्या सह्या आहेत. जिल्हा समन्वयक पदी मोहन पनुरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.