उस्मानाबाद –
सोजर मतिमंद निवासी शाळा कळंब येथे रविवारी (दि. ३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम शाळेतील शिक्षिका रोहिणी पवार, शकीला मुलाणी, लता पेटकर या स्त्री कर्मचारी व मुख्याध्यापक अर्जुन गरड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक चांगदेव शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध योजनांची माहिती सांगितली. तसेच त्या ऐक आदर्श महिला शिक्षिका होत्या असे आपल्या भाषणातून सागितले. शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन गरड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.