वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कास्ती बु. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी समीक्षा प्रवीण अगंबरे हिची अंतरिक्ष सहलीसाठी निवड झाल्याबद्दल शुक्रवारी (दि.२४) शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या अंतरिक्ष सहलीसाठीच्या परीक्षेत समीक्षा अगंबरे हिने जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरासाठी पात्र असलेल्या प्रतीक्षा लहू भंडारे याही विद्यार्थिनीचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण कार्यालयाचे कार्यालयीन विस्ताराधिकारी भास्कर बेशकराव होते. यावेळी लोहारा बीट शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बळीराम साबळे, सामाजिक कार्यकर्ते परवेज तांबोळी, शिक्षक दत्तात्रय फावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेच्या वतीने व बीटच्या वतीने समीक्षाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बेशकराव यांनी गरीब व होतकरू विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा लहू भंडारे हिचा इयत्ता दहावी पर्यंतचा शिक्षण खर्च करण्याचे जाहीर केले. यावेळी शिक्षक पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय फावडे यांनी ११०० रुपयाचे रोख बक्षीस समीक्षा हीस प्रदान केले. यावेळी मान्यवरांनी समीक्षाच्या यशापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे नमूद केले. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे, शिक्षक अनंत सुतार, बालाजी सोमवंशी, प्रवीण अगंबरे, शिवाजी पोतदार, नितीन वाघमारे, कोंडीबा गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट पोतदार यांनी तर नितीन कदम यांनी आभार मानले.