Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अनोख्या मंगल परिणयाने चिमुकल्यांना मिळाली मायेची सावली, बापाचे छत्र

admin by admin
12/07/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यात एक आगळा-वेगळा पुनर्विवाह पाहायला मिळाला. आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या लेकरांना या पुनर्विवाहाने मायेची सावली अन् वडीलांचे छत्र मिळाले तर एकमेकांना नवे जीवनसाथी. उमरगा तालुक्यातील मुळज येथील रविकांत विलास सोनकांबळे व दाबका येथील अयोध्या धनराज कांबळे या दोघांचा पुर्नविवाह शनिवारी (दि.१०) रोजी संपन्न झाला. रविकांत यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यात त्यांना दोन मुली व एक मुलगा असे अपत्य झाले. सुखी चालत असलेल्या संसारात पत्नीला कर्करोग झाला व त्यात दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. यामुळे लेकरावरील मायेचे छत्र हरवले. तर अयोध्या यांचा नवरा व्यसनाच्या आहारी जाऊन घरातून पळून गेला. एक लहान मुलगी आहे. नवरा पळून जाण्याने मुलीवरील बापाचे छत्र हरवले. विशेष म्हणजे रविकांत व अयोध्या यांच्या दोघांच्याही वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे दोघांचेही भवितव्य अंधारात होते. रविकांत व अयोध्या यांच्या पुनर्विवाह करण्याच्या विचाराने हा योग जुळून आला. हा विवाह उमरगा शहरातील बहुजन हिताय वसतिगृह येथे बौद्ध पध्दतीने संपन्न झाला. धम्मचारी प्रज्ञाजित यांच्या हस्ते हा विवाह लावण्यात आला. हा प्रकाशरुपी परिणय घडवून आणण्यासाठी दाबका येथील प्रा. संजीव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद कांबळे, प्रा. उत्तम कांबळे यांनी समुपदेशन करुन व विचार पटवून प्रयत्न केले. या विवाहप्रसंगी अनेक अनिष्ठ रुढीपरंपराना मूठमाती देणारे आणि नवे रचनात्मक पायंडे पाडणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. सगर सरांनी अशा प्रकारच्या विवाहांची गरज असल्याचे सांगून नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनास शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे यानी मनोगत व्यक्त केले. महिला प्रमुख अश्विनी कांबळे, महिला संघटक रंजना सुरवसे, धम्मचारी ज्ञानस्वर, धम्मचारी आर्यघोष, धम्मचारी शाक्यदिप तसेच वधू-वरांच्या आई सोजराबाई-काशीबाई यांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे कमी संख्येत, कोविड नियमानुसार अतिशय कमी खर्चात हा मंगल परिणय संपन्न झाला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील युवकांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश – माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते केला प्रवेश

Next Post

लोहारा तालुक्यातील 31 टक्के नागरिकांनी घेतली लस

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील 31 टक्के नागरिकांनी घेतली लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's