Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील 31 टक्के नागरिकांनी घेतली लस

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. कोरोनाच्या या भयंकर आजारापासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान आत्तापर्यंत तालुक्यातील ३१ टक्के नागरिकांनी लस घेतली आहे. कोरोनापासून स्वतःचाबचाव करण्यासाठी नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
लोहारा तालुक्यात दि. २ एप्रिल २०२० ला तालुक्यातील धानुरी येथे कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हळू हळू रुग्णसंख्या वाढत गेली. सुरुवातीच्या काळात तालुक्यात खूप कमी प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत होते. परंतु त्यानंतर काही दिवसांनी दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत गेली. यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी या परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता कोरोनाला अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागासह प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत होते. सर्वत्र रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवरही प्रचंड ताण वाढत होता. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होण्यापासून ते दवाखान्यात खाट उपलब्ध होण्यासाठी रूग्णाला तसेच प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. मागील दोन महिन्यात तर रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली होती. आता ती हळू हळू कमी होत आहे. कोरोनाच्या या भीषण संकटापासून बचाव होण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली. सुरुवातीला नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. परंतु त्यानंतर काही दिवसांनी लसीकरणास प्रतिसाद दिला. नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ३१.१ टक्के नागरिकांनी लस घेतली आहे.
लोहारा तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याच्या माध्यमातून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. तालुक्यात ६० वर्षांवरील ११ हजार ५१० नागरिकांपैकी ८ हजार ८०६ नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर १ हजार ७५८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ६० वयोगटातील एकूण २३ हजार ९५ नागरिकांपैकी ८ हजार ८५६ नागरिकांनी पहिला डोस तर १७६४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ४८ हजार ९० नागरिकांपैकी ७ हजार २५८ नागरिकांनी पहिला तर १ हजार ४३१ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. इतर दुर्धर आजार आलेल्या तालुक्यातील १२१३ नागरिकांपैकी ११९१ नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर ८७७ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. याप्रमाणे तालुक्यातील ८३९०८ नागरिकांपैकी २६ हजार १११ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर ५८३० नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.\"\"सद्यस्थितीत लोहारा तालुक्यात लसीकरणास म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. लोहारा तालुक्यात सध्या कोविशील्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. ऑनलाइन स्लॉट बुकिंग व ऑनस्पॉट नोंदणी या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे. कसलीही भीती न बाळगता जी लस उपलब्ध आहे ती घ्यावी. डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी

Ad 2
Ad 1
Tags: कोरोना लसीकरण
Previous Post

अनोख्या मंगल परिणयाने चिमुकल्यांना मिळाली मायेची सावली, बापाचे छत्र

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात यावेत – खासदार ओमराजे निंबाळकर यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र – पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आदेश

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात यावेत - खासदार ओमराजे निंबाळकर यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र - पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!