वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांचा मोफत पिकविमा फॉर्म भरलेल्या पावत्यांचे रविवारी (दि.२४) शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहे. अश्या शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीत लोककल्याण संस्थेकडून गेली ४ वर्षे मोफत पिकविमा फॉर्म भरून देऊन संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी कोराळ गाव व परिसरातील गावांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.
यावेळी दासमे यांनी सांगितले की, गावातील व परिसरातील १४७ शेतकऱ्यांचे मोफत फॉर्म भरून देण्यात आले व संस्थेतर्फे ही मोफत योजना गेली ४ वर्ष झाली आम्ही राबवत आहोत.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव रवि दासमे, हरिदास पवार, अशोकराव दासमे, राजेंद्र गायकवाड, प्रशांत पाटील, किरण दासमे, विद्यासागर सुरवसे, दिलीप सुरवसे, संस्था अध्यक्ष विक्रम दासमे, अजय सुरवसे, सत्यवान जाधव, शरद साळुंके, बालाजी शिंदे, बब्रुवान जामगे, प्रकाश भगत, विकास भगत, धनराज जंगाले, महेश भगत, गोविंद कोळी, अंकुश चोपडे, विकास सुरवसे, फुलचंद जामगे, सुधाकर सगर, दत्तात्रय सुरवसे, महेश माडजे, अजिम शेख, राजेंद्र सुरवसे, विश्वनाथ पवार, प्रकाश जंगाले, सखाराम कांबळे, तुकाराम दळवे, संभाजी लाळे, संभाजी सुरवसे, अजय सुरवसे, राजकिरण सगर, सिद्धांत मस्के आदीसह लोककल्याण संस्थेचे सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.