Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

by मुख्य संपादक
in उमरगा तालुका
A A
0

मुरूम, ता. उमरगा, ता. १३ (प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या काळात युवा पिढी मोबाईलच्या अति आहारी गेली आहे. या अतिरेकी वापरामुळे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर युवा पिढी मोठ्या प्रमाणात भरकटली जात आहे. या युवा पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी. वाचन म्हणजे मनाची मशागत, वाचनाने मस्तक समृद्ध बनते, समृद्ध झालेले मस्तक तरुणांचे व्यक्तिमत्व घडवते त्यामुळे वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले.
मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ग्रंथालय विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा व शाळा संपर्क अभियान (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : २०२०) अंतर्गत व्याख्यानाप्रसंगी सोमवारी (ता. १३) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य करबसप्पा ब्याळे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक प्रा. डॉ. सुशील मठपती, प्रा. डॉ. सुजित मटकरी, ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. महेश मोटे म्हणाले की, विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमासोबत अवांतर वाचन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने आनंददायी वाचन चळवळ सुरू करण्याचा उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, भाषा कौशल्यांचा विकास, तर्कशक्ती व सर्जनशीलता वाढविणे, तणावमुक्त शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची जोपासना आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे महाराष्ट्रभर आयोजन करण्यात येत असल्याचे शेवटी ते म्हणाले.
प्रा. डॉ. सुशील मठपती म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुण, तंत्र कौशल्यांच्या विकासासोबतच त्यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, स्वायत्तता, आनंददायी शिक्षण व स्वतःच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. अशोक सपाटे की, विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून अवांतर वाचनाचा संकल्प करावा. नितीन कंटेकुरे, विजयालक्ष्मी भालेराव, प्रा. अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुजित मटकरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमास विविध शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

\"\"
Ad 2
Ad 1
Tags: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमाधवराव पाटील महाविद्यालयमुरूम
Previous Post

उंडरगाव जिल्हा परिषद शाळेत कौशल्य विकास बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!