Vartadoot
Saturday, July 25, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल

मुख्य संपादक by मुख्य संपादक
10/01/2025
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल
Ad 10

उमरगा/मुरुम (दि.१०) सामाजिक प्रश्नांच्या मुळापर्यंत जावून उत्तरे शाधायची असतील तर वैचारिक वादविवाद आवश्यक आहे असे प्रतिपादन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी केले. ते काल श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक चिटणीस शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या स्मरणार्थ आयोजित शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. या प्रसंगी मा. पद्माकररावजी हराळकर, डॉ. सुभाष वाघमोडे, मा. अशोकराव पाटील, मा. रामराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. निजामी राजवटीमध्ये मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा मिळावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि नेतृत्व गुण विकसित व्हावेत यासाठी विविध सामाजिक विषयावर विचारमंथन घडवून आणण्याच्या हेतूने या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या चाळिसाव्या वर्षातील स्पर्धेसाठी “वर्गातील वाढती अनुपस्थिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मारक आहे/नाही” या ज्वलंत विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या चार जिल्ह्यातील संघांनी आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खुडे दिव्या व कोकाटे यशोदा यांच्या संघाने प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार एक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र तर लोहारा येथील भानुदासराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालयातील बादुले सानिका व गिल्डा संजीवनी यांच्या संघाने सांघिक द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार एक व प्रमाणपत्र पटकाविले. तर निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या वाडकर गीता यांना वैयक्तिक तीन हजार रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोल भैय्या मोरे, सहचिटणीस डॉ. सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. सुधीर मठपती, डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. परमेश्वर सूर्यवंशी आणि डॉ. सुभाष इंगळे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक वसंत हिस्सल, उपप्राचार्य जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, संयोजन समितीचे प्रमुख डॉ. विनोद देवरकर, डॉ. चंद्रसेन करे, डॉ. सन्मुख मुच्छट्टे, डॉ. व्ही. एम. गायकवाड, प्रा. अनंत कसगीकर, प्रा. शेखर दाडगे, प्रा.महेश माकणिकर, प्रा. एम. डी. साळुंके, डॉ. प्रवीण जवळगेकर, प्रा. बी. व्ही. मोरे, आणि प्रा. एस बी कल्हाळीकर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप पाटील यांनी तर डॉ. विनोद देवरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: बलसुरवादविवाद स्पर्धा
Previous Post

तुळजापूर येथील पी.एम. श्री नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची बालसंसद उत्साहात संपन्न

Next Post

धाराशिव मध्ये आज जन आक्रोश मोर्चा; संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील मोर्चात होणार सहभागी

Related Posts

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
Next Post
धाराशिव मध्ये आज जन आक्रोश मोर्चा; संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील मोर्चात होणार सहभागी

धाराशिव मध्ये आज जन आक्रोश मोर्चा; संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील मोर्चात होणार सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's