उमरगा / सुमित झिंगाडे
उमरगा तालुक्यातील भुसणी येथील महालक्ष्मी मंदिराच्या यात्रा महोत्सवाचे दि. १ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. उमरगा तालुक्यातील भूसणी, औराद व कदेर सिमेवर असणाऱ्या या महालक्ष्मी मंदिराच्या यात्रेचे हे सातवे वर्ष असून यासाठी तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
खादी ग्रामोद्योग महामंडळ, मुंबईचे सहसंचालक विद्यासागर हिरमुखे व उद्योजक संजय हिरमुखे यांच्या पुढाकारातुन हि यात्रा संपन्न होते. वेदमूर्ती अशोक श्रीधर मुळजकर यांच्या पौरोहित्यात वरील सोहळा संपन्न होणार आहे. सोमवारी (दि.३१) सातव्या वर्षपूती निमित्त भुसणी, कदेर व औराद येथील आराधी मंडळ तसेच शिव व हरी भजनी मंडळच्या वतीने जागरसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. १) सकाळी ६.३० वाजता महालक्ष्मी मातेच्या अभिषेकासाठी जलकुंभ यात्रा सकाळी ७ वा. गणपती पुजन आणि पण्यवाचन ७.३० वा. अग्नी स्थापना ८ वा. देवता स्थापना , ९ वाजता मुख्य देवता हवन व १० वाजता यज्ञाची सांगता व पूर्णाहुती १०.३० वाजता महालक्ष्मीची महाआरती ११.०० वाजता महाप्रसाद व रात्री ८.०० जागरसेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी सावित्रीबाई बंजाराट भजन मंडळ गुलबर्गी व प्रल्हाद महाराज बंजारा भजन होणार आहे. ही यात्रा भुसणी, औराद, कदेर, कदेर तांडा, औराद तांडासह तालुक्यातील समस्त गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भुसणी, औराद, कदेर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.