वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम मधील यशवंत नगर येथील अंगणवाडी क्रमांक एक येथे बुधवारी (दि. १०) अंगणवाडीतील मुलांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यासाठी प्रात्यक्षिकद्वारे विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या परिसरात रॅली काढून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्वच्छ हात धुण्याचे महत्त्व, हँडवॉश आणि साबणाने हात धुऊन प्रात्याक्षीकाद्वारे दाखविण्यात आले. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबद्दल विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या माता-पालक यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी अंगणवाडी कार्यकर्ती मनीषा माने, अश्विनी कांबळे, शितल मुरूमकर, तृप्ती गायकवाड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, माता-पालक उपस्थित होते.