वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे सोमवारी (ता.१३) सभासद नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या पुढाकाराने येणेगूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या सभासद नोंदणीकरिता जिल्हा उपाध्यक्ष भीमादादा स्वामी, तालुकाध्यक्ष संजय पवार, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शमशुद्दिन जमादार, ज्येष्ठ कार्यकर्ते नेताजी कवठे, माजी सरपंच आयुबभाई जवळगेकर, उपसरपंच राहुल बनसोडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अप्पू हिप्परगे, माजी उपसरपंच वैभव बिराजदार , माजी सैनिक बसवेश्वर माळी, योगीराज स्वामी, दिपक हिप्परगे, मल्लिनाथ गायकवाड, संतोष बनसोडे, रमेश कागे, युनुस देशमुख, आसिफ मुल्ला, सुरेश पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर सदस्य नोंदणी अभियान मोहिम पार पडली.