वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचालित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या औषध निर्माण शास्त्र पदविकेच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी उमरगा शहरातील श्री गजानन हॉस्पिटलला भेट देऊन येथील विविध विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी गजानन हॉस्पिटलचे डॉ. सुभाष वाघमोडे व डॉ. पराग वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना अतिदक्षता कक्षचे महत्व समजावून सांगितले. निरनिराळ्या आजारांवर देण्यात येणाऱ्या औषध उपचार याविषयी माहिती दिली. डॉ. सुभाष वाघमोडे यांनी लहान मुलांच्या आजार व उपचारासाठी लागणारी औषधे याविषयी आपले अनुभवी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे हित व सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य कवलजीत बिराजदार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रा. शैलेंद्र घुले, प्रा .प्रदिप डीग्गे, प्रा .सूरज भगत, प्राध्यापिका पुजा भावे, राजेश्री जाधव, दिपाली भगत, स्नेहल चनशेट्टी , अभिलाषा हांडे, प्रिती शिंदे, गणेश वाघमोडे, किशोर गायकवाड व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.