वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे डी.फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विविध कार्यक्रम घेवून निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कवलजीत बिराजदार हे होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने वेगवेगळ्या टास्क देण्यात आल्या. त्यावरून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. तसेच टॉपर्स विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी कांबळे व वैष्णवी कांबळे या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी प्राचार्य कवलजीत बिराजदार यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पुढल्या शिक्षणसाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर जीवनात दृढनिश्चय, कठोर परिश्रम व व्यक्तीमत्व विकास, व्यसनापासून दूर राहून अभ्यासात लक्ष गुंतविणे अनेक प्रकारचे ज्ञान मिळविणे संवेदनशीलता, तारतम्य, सतत निरीक्षणे घेण्याची आणि त्यातून निष्कर्षांप्रत पोहोचण्याची चिकाटी आणि संयम, मेहनत सातत्य या गोष्टी जीवनात सोने करण्यासाठी खूप आवश्यक ठरतात असे सांगून विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.सय्येद सुमैय्या व अंकिता वडरगे यांनी आभार मानले. प्रतीक्षा पवार, प्रिया पाटील, पुजा गाडेकर, प्रतिज्ञा वाकडे, तेजस कांबळे, योगेश नीला, हलमजगे या सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यातुन व प्राध्यापिका पुजा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. प्रशांत माने, प्रदिप डिग्गे, प्रा. शिलेंद्र घुले, प्रा. सुरज भगत प्राध्यापिका धृती माने, प्राध्यापिका पुजा भावे, राजेश्री जाधव, प्रा. अभिलाषा हांडे, प्रिती शिंदे, प्रा. दीपाली भगत, प्रा. स्नेहल चनशेट्टी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.