Vartadoot
Saturday, January 31, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन – महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा टोलनाके बंद करण्याचा दिला ईशारा

admin by admin
07/11/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा : उमरगा लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात विविध मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली, प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाबा जाफरी, उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा येथील अशोक चौकात सोमवारी (दि.७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. तर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून धरल्याने वाहतूक दीड तास ठप्प होती.


हे खोके सरकार भाजप सरकारचे हस्तक असून महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग धंदे गुजरातला हलवून महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करण्याच षडयंत्र करीत आहे. मागील आठ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस सनदशील मार्गाने महामार्गाच्या कामासाठी सातत्याने आंदोलन करीत आहे. महामार्गाची मागणी पूर्ण न झाल्यास येत्या १२ डिसेंबर नंतर टोलनाके बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या भाषणात केले. शेतकरी बांधव अडचणीत असताना सत्ता हातात असूनही हे शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. स्वतःची घर भरणाऱ्या या सरकारला शेतकरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असे मत लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी व्यक्त केले. उमरगा लोहारा तालुक्यातील विविध प्रश्न आधांतरी ठेवून गुवाहाटी ,सुरत, करत फिरण्यासाठी जनतेने लोकप्रतिनिधींला निवडून दिलेले नव्हते. जनता येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत या गद्दारीची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे मत उद्योग सेलचे प्रदेश सहसचिव जगदीश सुरवसे यांनी भाषणात व्यक्त केले. यावेळी दिग्विजय शिंदे, बाबा जाफरी, प्रकाश सुभेदार, शमशोद्दीन जमादार आदींची भाषणे झाली.

ओला दुष्काळ जाहीर करावा, २०२० चा शिल्लक पिक विमा त्वरीत मिळावा, उमरगा – लोहारा तालुक्यातुन जाणाऱ्या महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत, यात क्वॉलीटी कंट्रोल (गुणवत्ता नियंत्रक) विभागातल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन निलंबीत करावे, अर्धवट स्थितीतील काम पुर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाके बंद करावेत व त्वरीत रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच अर्धवट स्थितीतील उड्डाण पुलाचे कामे त्वरीत पुर्ण करावीत, महाराष्ट्रातील वेदांता, फॉक्सकॉन , टाटा एअर बस हे व यासारखे इतर उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रात पुनर्वस्थापित करावेत, उमरगा – लोहारा तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या अर्जदारांचे प्रस्ताव त्वरीत मंजुरी देऊन निकाली काढावेत, शेतकऱ्यांचे बंद करण्यात आलेले रेशन (शिधा) त्वरीत चालु करण्यात यावे, गगनाला भिडलेली महागाई कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने संयुक्त उपाययोजना कराव्यात आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.


यावेळी भीमा स्वामी, बापू बिराजदार, बाळासाहेब स्वामी, गोविंदराव साळुंखे, अच्युत साठे, खाजा मुजावर, शंतनू (भैय्या ) सगर, जालिंदर कोकणे, धीरज बेळंबकर, सुनिता पावशेरे, मोहन जाधव, बाबा पवार, सचिन रणखांब, भाग्यश्री रणदिवे, साधना सलगरे, संगीता सलगरे, सविता पवार, सुशील दळगडे, बालाजी साळुंखे, नेताजी कवठे, कुमार थिटे, मोहन शिंदे, अजित पाटील, ओम गायकवाड, माधव नांगरे, बाळासाहेब बुंदगे, प्रकाश भगत, फरीद अत्तार, फैयाज पठाण, रणजीत बिराजदार, नंदू जगदाळे, दिलीप भगत, वाघंबर सरवदे, खंडू काळे, प्रभाकर माने, विठ्ठलसिंह राजपूत, अयुब इनामदार, बाळू माशाळ, किसन कांबळे, कल्लेश्वर जाधव, नंदू बिराजदार, बाळू परताळे, सतीश सुरवसे आदीसह पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारराष्ट्रवादी काँग्रेसरास्ता रोको आंदोलन
Previous Post

नवीन मतदार नोंदणी करिता १० नोव्हेंबर ला सर्व ग्रामपंचायती मध्ये होणार विशेष ग्रामसभा – तहसिलदार संतोष रुईकर यांनी दिली माहिती

Next Post

हाती मशाल घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल – भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यात आगमन

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

हाती मशाल घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल - भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यात आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's