Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा खुलासा – कोविडबाबत खबरदारी घेण्याचे नागरिकांना केले आवाहन

admin by admin
21/02/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि त्यांच्या पत्नीला कोविड चा संसर्ग झाला आहे. कोविडबाबत खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले असून कोविड लस घेतली तरी जिल्हाधिकाऱ्यांना कोरोणाची लागण झाली अशा स्वरूपाच्या बातम्या समाजमाध्यमांमध्ये येत आहेत. यामुळे
लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी खुलासा केला आहे.
यात त्यांनी म्हणले आहे की, मागील काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली आहे. बहुतांश नागरिक मास्क न घालता गर्दी करत आहेत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावतात, पण आपल्या बाबतीत व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे नो मास्क नो एन्ट्री आवश्यक आहे. मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत. हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहावे. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या. आपल्याला समाधान आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात मागील सहा महिन्यात ज्या सोयीसुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे.
मागील आठवडाभरात आपण कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये आपल्याकडे केवळ ६० ऑक्सिजन बेडस, १८ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. सद्यस्थितीत फेब्रुवारी २०२१ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात ११०० ऑक्सीजन सपोर्टेड बेडस् आहेत. १९६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. इतरही अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेसाठी तयारी करताना अँटीजन किट्स, N95, नवीन ऑक्सीजन सिलेंडर, नवीन २०० ऑक्सीजन लाईन, 2 डी इको व इतर नवी यंत्रसामग्री याबाबत नियोजन केलेले आहे. ९६० सीसीसी बेड्सची सुविधा पूनःस्थापित करण्याचे काम वेगात सुरू आहे. लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी, विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग ही प्रक्रिया वेगात राबवायची
आहे. लोकांनी कोणतेही लक्षण अंगावर काढू नये. यासाठी सरकारी, खाजगी हॉस्पिटल्स व सर्वांनीच जनजागृती केली पाहिजे.
किंबहुना मी लस घेतली आहे. त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही असे म्हणत मी दुर्लक्ष केले असते तर माझ्याकडून इतर लोकांना संसर्ग झाला असता. माझ्यासोबत माझी पत्नी प्रियांका बोकील याही कोविड पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी महत्वाची ठरते. यामुळे नागरिकांना पुनश्च आवाहन की कोणतेही लक्षण अंगावर काढू नये. लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी.
काल केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची एसओपी प्राप्त झाली आहे. त्या एसओपी आणि राज्य शासनाच्या विविध सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपण सर्वजण मागील एक वर्षापासून कोविडच्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे काम महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे. पुढेही करत राहू अशी सदिच्छा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आवाहनकौस्तुभ दिवेगावकरखुलासाजिल्हाधिकारी उस्मानाबाद
Previous Post

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण

Next Post

महा ङिजीटल मिङीया असोसिएशनचा मुंबई दौरा यशस्वी – विविध मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

महा ङिजीटल मिङीया असोसिएशनचा मुंबई दौरा यशस्वी - विविध मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's