वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ऑक्सफाम इंडिया या संस्थेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा तालुक्यातील २५ गावातील ऊसतोड कामगार नोंदणी अभिनायाची सुरुवात यूवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. आमदार ज्ञानराज चौगुले, भूमिपुत्र वाघ नायब तहसीलदार काजळे साहेब, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूर यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सदानंद शिवदे पाटील, प्रदीप मदने, गोपाळ जाधव, मेजर संजय लोंढे, कृष्णा पाटील, आकाश मोरे, रोहित पवार, महादेव बडूरे, संदीप चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये अभियानाची सुरुवात करण्यात आली. ऊसतोड कामगारांची नोंदणी व्हावी त्यासोबत शासनाच्या योजना ऊसतोड कामगारांना व त्यांच्या मुलांना मिळाव्यात सोबत ऊसतोड कामगारांच्या इन्शुरन्ससाठीही फायदा होईल. या जनजागृतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील २५ हजार ऊसतोड कामगाराची कायदेशीर नोंदणी होऊन त्यांना फायदा होईल असे मत ऑक्सफाम इंडियाचे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम ऑफिसर निखिल वाघ यांनी यावेळी दिली.