वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील भुसणी रोड लगत असणाऱ्या गणेश नगर ग्रामपंचायत हद्दीतील राज्यात नावारूपाला येत असलेल्या क्लासिक डेव्हलपर्स अँड बिल्डर्सकडून ग्राहकांना रो-हाऊस व बंगलोच्या चावी वितरण कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १९) संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, सेवानिवृत्त साखर सहसंचालक डी. आय. गायकवाड, माकणीचे ऐजाज सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मसुद शेख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस इलियास पिरजादे, मार्केट कमिटीचे माजी संचालक सलीम आत्तार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, क्लासिक डेव्हलपर्सचे बिल्डर असलम सय्यद, मुख्य इंजिनीयर जिशान तांबोळी, विठ्ठल साई कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, नागुआण्णा पत्रिके, शरणाप्पा पत्रिके आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बसवराज पाटील यांच्या हस्ते रो-हाऊसचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. रो-हाऊसचे ग्राहक अजित तांबोळी, पांडुरंग पवार, बालुसिंग राजपूत, प्रल्हादसिंग ठाकूर, खाजा तांबोळी, मुनीरपाशा जेवळे यांना रो-हाऊस, बिग बंगलोची चावी देवून लोकार्पण व या जमिनीचे मालक रुकप्पा बन्नेसह त्यांच्या परिवारास भरती आहेर देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा येथील डिग्गी रोड लगत असणाऱ्या क्लासिक डेव्हलपर्सच्या नूतन साईटच्या प्रोजेक्टच्या कार्डचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मसुद शेख व डी. आय. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. बसवराज पाटील बोलताना म्हणाले की, अशा प्रोजेक्टमुळे मुरूम शहराच्या सौंदर्य व वैभवात भर पडली आहे. या रो-हाऊसच्या संस्कृतीमुळे विविध जाती धर्माचे लोक एकत्र येवून राहतात. यामुळे सामंजस्याचे वातावरण निर्माण होऊन सामाजिक बांधीलकीची भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. प्रमोद जाधव, निजाम जेवळे, आयुब चाऊस, मोईन मास्टर, अजिज सय्यद, मुसा सय्यद, सौदागर शेख, महेबुब सय्यद, फजल कादरी, इस्माईल शेख, गुंडू भाई, मुस्तफा शेख आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शरद गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार तर आभार पाशा कोकळगावे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जिल्हा व परिसरातील विविध क्षेत्रातील संस्था, संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.