वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना व क्युनर्जी इंडस्ट्रीजच्या वतीने सन २०२१-२२ च्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाच्या नियोजनासंदर्भात सोमवारी ( दि. १५ ) संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत परिसरातील कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक २३५१ रुपये भाव दिल्याबद्दल शेतकरी सभासदांच्या वतीने चेअरमन सुरेश बिराजदार व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र रनवरे यांचा सत्कार करण्यात आला.
कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केले जाईल. यासाठी मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, छकडे, ट्रक यांची मुबलक प्रमाणात व्यवस्था करण्यात आली असून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक 2351 रुपये भाव दिला आहे. ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांनी संयम ठेवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन सुरेश बिराजदार यांनी केले. तर कारखान्याचे नुकतेच विस्तारीकरण पूर्ण झाले असून कारखाना चार हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप करीत आहे. प्रशासनाने सभासद शेतकऱ्यांच्या संपूर्ण ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. मागील हंगामात ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना २२०० + १५१ असे २३५१ रुपयाने देयक अदा केले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन क्युनर्जी इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक श्री रनवरे यांनी केले आहे.यावेळी कारखान्याचे संचालक सुनील माने, राहुल पाटील, गोविंदराव साळुंके, इमाम पटेल, योगीराज स्वामी, आर .डी. माने, किसन पाटील, देविदासराव माडीवाले, युवराज कदम यांच्यासह ऊस पुरवठा अधिकारी श्री. शेंडगे, शमशोद्दीन जमादार, अमोल चव्हाण, बाळु बुंदगे, बाळु फरताळे, यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद उपस्थित होते.निश्चित केलेल्या कालावधी व नोंदी नुसार सर्वांचाच ऊस गाळप होणार आहे. याही वर्षी सर्वाधीक भाव देण्याचा मानस असुन गाळपासाठी ठरलेल्या कालावधीचे संयमाने पालन करत जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा – प्रा. सुरेश बिराजदार