वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी (दि.२१) उमरगा तालुक्यातील कवठा शिवारातील अतिवृष्टी, शंखी गोगलगायी, यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्याकडे उमरगा-लोहारा तालुक्यातील अतिरिक्त पर्जन्यमान व पीक नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करून दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
राज्य सरकारने SDRF – NDRF अंतर्गत मिळणाऱ्या रकमेच्या दुप्पटची मदत करण्याची घोषणा याआधीच केली असून यासाठी प्रशासनाने आवश्यक ठिकाणचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून घ्यावे व एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी ज्ञानराज चौगुले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी गणेश पवार,
तहसीलदार राहुल पाटील, तालुका कृषी अधिकारी एस.एन.बारवकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन पाटील, विनायकराव पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक विलास भगत, कवठा गावचे सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच विकास पाटील, नितीन पाटील, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण कोकणे, तलाठी प्रदीप पवार, व्यंकटराव सोनवणे, शेखर घंटे, बालाजी पवार, व्यंकट पाटील, परवेज तांबोळी, विनोद मुसांडे, शरद इंगळे, काकासाहेब चव्हाण, परमेश्वर साळुंके, संदीपान बनकर, चंद्रकांत मुळे, अभिमान खराडे, काका गायकवाड, संदिप चौगुले, अमीन सुंबेकर, ओम कोरे, प्रमोद बंगले, शिवराज चिनगुंडे, विठ्ठलराव बदोले, सुभाष राजोळे, मनीष माणिकवार आदीसह शेतकरी उपस्थित होते.