उमरगा : तालुक्यातील कोराळ येथील जलजीवन मिशन योजने अंतर्गत ९८ लाख ९५ हजार किमंतीच्या १ लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे तसेच विंधन विहीर, पाण्याच्या टाकीपर्यंतची मुख्य पाईपलाईन तसेच गाव अंतर्गत पाईपलाईनचे भुमिपुजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते शनिवारी (दि.२९) करण्यात आले.
गावकऱ्यांनी योग्य व्यक्तीच्या हातात गावचा कारभार दिला तर गावचा विकास किती चांगला होऊ शकतो हे सरपंच विष्णु भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये विकास कामे करून दाखवलं आहे. प्रशासना मध्ये गावचा माणूस असला की गावासाठी विकासात्मक धोरण राबवणं किती सोपं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणून महेश भगत यांच्याकडे पाहता येईल असे प्रा. सुरेश बिराजदार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
गावामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास ३.६३२ कि.मि. सिमेंट रस्ते, स्वागत कमान उभारणी, गावातील जवळपास २.५ किमी. अंतराची गटार बांधकाम, वाढीव वस्ती मधील ५५ विद्युत पोल, भारत निर्माण योजनेअंतर्गत गावातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम, मुख्य पाईपलाईन अंतर्गत नळ कनेक्शन, बसस्टँड जवळ विद्युत टॉवर, कोराळ शिवारातील शेत रस्त्यावरील पुल बांधकाम, गाव अंतर्गत पुल बांधकाम, गावातील शेतकऱ्यासाठी शेतीविषयक पुस्तके ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध करून देणे, भवानी मंदिराचे सभा मंडप, आशा प्रकारे उत्तम विकासकामे करत असताना याची योग्य दखल प्रशासकीय विभागावरती घेतली गेली आणि कोराळ गावाला स्मार्टव्हीजन तालुकास्तरीय प्रथम पारितोषक, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार अशी मानांकन दहा वर्षामध्ये मिळऊन दिल्याचा अभिमान असल्याचे सांगत प्रा. बिराजदार यांनी कोराळ गावच्या विकासाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, गोविंदराव साळुंके, युवकचे तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा संगीता काळे, कोराळ गावचे सरपंच विष्णु भगत, गावच्या विकासामध्ये पडद्यामागची खरी भुमिका निभावनारे इंजि. महेश भगत, उपसरपंच विठ्ठल लाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, श्रावण गायकवाड, माजी उपसरपंच बळीराम लाळे, विष्णु साळुंके, जिल्हा कार्यकारणी सदस्य जिवन शिंदे, उद्योग व्यापार विभागाचे तालुका कार्याध्यक्ष शिवय्या स्वामी, युवक तालुका उपाध्यक्ष नितीश सुरवसे, अजय सुरवसे, वक्ता विभागाचे लोहारा तालुकाध्यक्ष सचिन रणखांब, प्रकाश भगत, माजी पोलीस पाटील बब्रुवान सुरवसे, हभप बालाजी महाराज, माजी सैनिक बालाजी सुरवसे, बब्रुवान सुरवसे, संजय चोपडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कोराळ गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीक, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते.