वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
केंद्र शासनाकडून कोविन पोर्टलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यापुढे आयोजित प्रत्येक कोविड १९ सत्र ठिकाणी ऑनलाइन व ऑनस्पॉट या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने नोंदणी करणे शक्य होणार आहे. पोर्टलवर लसीकरण सत्र निर्माण करून प्रसिध्द केल्यानंतर ऑनलाइन व ऑनस्पॉट या पद्धतीने नोंदणी करण्यासाठी दोन्ही करिता समान स्लॉट्स उपलब्ध असणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. २२ जून २०२१ व त्यापुढे आयोजित केल्या जाणाऱ्या लसीकरण सत्रकरिता ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
याकरिता मंगळवारी दि. २२ जून २०२१ रोजी आयोजित लसीकरण सत्रांकरिता ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करून स्लॉट्स बुक करणेकरिता सोमवारी दि. २१ जून २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता स्लॉट्स खुले केले जाणार आहेत. आणि यापुढे दररोज सायंकाळी पाच वाजता पुढील दिवशी आयोजित लसीकरण सत्रांमधील ऑनलाइन बुकिंग साठीचे स्लॉट्स खुले केले जाणार आहेत. ज्या लाभार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने बुकिंग करणे शक्य नाही, अशांकरिता समान क्षमतेने ऑनस्पॉट पद्धतीने नोंदणी सुविधा ( म्हणजेच लसीकरण सत्र सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करून लस घेणे) देखील उपलब्ध राहणार आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.
सध्या कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. परंतु लस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लस घ्यावे व प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!