उस्मानाबाद प्रतिनिधी :
बडोदा ते हैद्राबाद असा प्रवास करत असलेला मालवाहू ट्रक क्र. यु.टी. 70 जीटी 5773 हा दि. 24.11.2022 रोजी 01.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर येरमाळा ते येडशी दरम्यान वडगाव फाटा येथे आला असता नमूद ट्रकचे पुढील चाक पंम्चर झाले. यावेळी चालक सद्दाम हुसेन कुरेशी, रा. दुबाई, ता. सुरावह, जि. ईलाहाबाद, राज्य- उत्तरप्रदेश यांनी नमूद ट्रक रस्त्याबाजूस घेउन त्यांसह त्यांचे सहायक फौजान गुलहसन कुरेशी व सादीक नयाबआली कुरेशी हे तीघे ट्रकचे चाक दुरुस्त करत असताना चार अनोळखी इसमांनी तेथे जाउन त्यांना टॉमी, काठीने मारहाण करुन ट्रकच्या इंधन टाकीतील सुमारे 105 लि. डिझेल, ट्रकच्या केबीनमधील 5,000 ₹ रोख रक्कम, टेप रेकॉर्डर व सद्दाम यांच्याजवळील 1,000 ₹ रक्कम असा एकुण 18,660 ₹ चा माल जबरीने लुटला होता. अशा मजकुराच्या फौजान गुलहसन कुरेशी यांनी दि. 24.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 318/2022 हा भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खामकरवाडी, ता. वाशी येथील राहुल अर्जुन काळे उर्फ बबलु, वय 25 वर्षे यास गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत खामकरवाडी शिवारातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने प्रथमत: पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी 70 लि. डिझेल व टेप रेकॉर्डर असा माल हस्तगत करून पुढील कार्यवाहिस्तव त्यास चोरीच्या मालासह येरमाळा पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा पोलीश शोध घेत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहाण पठाण, महेबुब अरब, नितीन जाधवर, अजित कवडे, दिनेश उंबरे, वैशाली सोनवणे, बबन जाधवर यांच्या पथकाने केली आहे.