वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांची श्रीशैलम जगद्गुरु पिठाच्या ट्रस्टवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल यशवंत नगर येथे मंगळवारी (दि.२) सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश अष्टे, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, बबनराव बनसोडे, नगरसेवक शभुलिंग पाटील, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, राम डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नंदकुमार कोळी, विजयकुमार कोळी यांच्या वतीने बापुराव पाटील यांचा शाल, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी शरण पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सपाटे यांनी केले. सुनिल कोळी, नंदु कारंडे, सुरज बरबडे, अर्जुन वायचळे, सज्जाद शेख, भानुदास पवार, विजयकुमार देशमाने, गुलाब क्षीरसागर, देवराज संगुळगे, हनुमंत वासुदेव, कारभारी, राजु मुल्ला आदींनी पुढाकार घेतला. सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर विजयकुमार देशमाने आभार यांनी मानले.