वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
माहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या नीट (NEET) परीक्षेत मुरूम येथील यश पंडित मोहिते या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या यश मोहिते या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील जिल्हा बँकेचे शाखाधिकारी पंडित मोहिते यांचा मुलगा यश याने नुकत्याच झालेल्या नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. यशचे ५ वी पासूनचे शिक्षण लातूर येथे झाले आहे. यानिमित्ताने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांनी यशचा सत्कार करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुरूम विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता चटगे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरूळे, नगरसेवक रशीद शेख, उमरगा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल वाघ, उमरगा पालिकेचे नगरसेवक महेश मशाळकर, सिद्राम बालकुंदे, व्यंकट बेंडकाळे, पंडीत मोहिते, प्रकाश भोसगे आदी उपस्थित होते.