Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

नदीपत्राच्या पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान – पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्यूज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात सोडलेल्या या पाण्यामुळे नदीपात्राच्या शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु रविवारी रात्री झालेल्या पावसानंतर सोमवारी पहाटे ९ ते १० दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीपात्राच्या शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात राजेगाव, एकोंडी, रेबे चिंचोली, कवठा याठिकाणी सोयाबीन पाण्याखाली आहे. पाणी इतके होते की, नदीपात्राच्या दक्षिण बाजूस ५०० मीटर व उत्तर बाजूस ५०० मीटर अंतरापर्यंतच्या शेतात पाणी आले होते असे राजेगाव येथील शेतकरी अविनाश देशमुख यांनी सांगितले आहे. या ठिकाणी सोयाबीनच्या नुकसानीसह पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील माती वाहून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

\"\"
नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अविनाश देशमुख, अजित देशमुख, नागनाथ माने, आण्णा देशमुख, संजय देशमुख, राहुल देशमुख, समाधान मोरे, गोकुळ मोरे, विद्याधर मोरे, भवन देशमुख, प्रताप मोरे, अमोल देशमुख, अशोक देशमुख, नरेंद्र पाटील, नरेंद्र मोरे, शाहुराज देशमुख, विलास पाटील, बाजीराव पाटील, प्रदिप देशमुख, गोपाळ पाटील, प्रकाश देशमुख, रिंकू पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मागील दोन तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. यापुढील काळात माकणी धरणाच्या पाण्याने नुकसान झाले तर मी आत्मदहन करणार असा ईशारा राजेगाव येथील शेतकरी अविनाश देशमुख यांनी दिला आहे.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: निम्न तेरणा प्रकल्प माकणीनुकसानशेती
Previous Post

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद – सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

नकली पनीर कारखान्यावर कारवाई – तब्बल ८९९ किलो नकली पनीर केले जप्त

Related Posts

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Next Post

नकली पनीर कारखान्यावर कारवाई - तब्बल ८९९ किलो नकली पनीर केले जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!