वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच भंडारी ग्रुप ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्या कै. निशिगंधा किशोर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवारी (दि.17) भंडारी गावातील माळावरील घरोघरी केशर आंबा वृक्ष रोप वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होते. मागील काही दिवसांपूर्वी भंडारी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या कै. निशिगंधा किशोर पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे पती किशोर पाटील यांच्या मनात विचार आला की, पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष रोप वाटप करावे. जेणेकरून निसर्गाचे संवर्धन होईल व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. या उद्देशाने त्यांनी पत्नी कै. निशिगंधा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.17) भंडारी गावातील माळावरील घरोघरी स्वखर्चाने केशर आंबा वृक्ष रोप वाटप करण्यात आले. यावेळी 71 रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच पुढील तीन चार वर्षात कालबद्ध कार्यक्रम राबवून स्वखर्चाने भंडारी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात घरोघरी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प किशोर पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.