वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील, उपाध्यक्षपदी विरभद्र फावडे, सचिवपदी गणेश पालके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लोहारा शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येते. यावर्षीही विविध सामाजिक उपक्रमांनी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याचे आयोजन केले आहे. दि.२२ एप्रिल रोजी ध्वज पुजन, प्रतिमा पुजन, किर्तन, दि.२३ रोजी शहर व परिसरातील शिव भजनी मंडळाचे भजन, दि.२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवनगर मिरवणूक काढण्यात येणार आहे.
जयंतीच्या नियोजनाची चर्चा करण्यासाठी व कार्यकारिणी निवडण्यासाठी लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात नागण्णा वकील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील प्रमाणे जयंती उत्सव समिती कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी ओम पाटील, उपाध्यक्षपदी विरभद्र फावडे, सचिवपदी गणेश पालके तर कोषाध्यक्ष गणेश कोप्पा, सहसचिव बाळु माशाळकर, मिरवणूक प्रमुख अमोल बिराजदार, रोहित नारायणकर तर जालिंदर कोकणे, के.डी. पाटील, विक्रांत संगशेट्टी, हरी लोखंडे, बापु जट्टे, वैजीनाथ बिराजदार, अंकुश नारायणकर, ऍड. राजु माशाळकर, कमलाकर मुळे, ओंकार घोंगडे, समर्थ कुंभार, महेश पाटील, राजु स्वामी आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
या बैठकीला शंकर अण्णा जट्टे, दत्ता बिराजदार, शरणाप्पा जट्टे, बलू स्वामी, वैजीनाथ जट्टे, शांतिवीर अप्पा जट्टे, मल्लिनाथ घोंगडे, वैजीनाथ होंडराव, सोमनाथ जट्टे, मल्लिनाथ बनशेट्टी, राजशेखर माणिकशेट्टी, बाळासाहेब कोरे, बसवराज जट्टे, बसवराज बिडवे, मुन्ना माशाळकर, विकास होंडराव, राजु जट्टे, श्रीशैल्य मिटकरी, दयानंद स्वामी, ओम कोरे, कपिल माशाळकर, राजु कोराळे, महेश कुंभार, किरण तोडकरी, प्रसाद मिटकरी यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.