तसेच अभ्यासक हरी नरके यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना अभ्यासक हरी नरके म्हणाले की, ओबीसी आरक्षण गेलं हे पाप पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांचं आहे. मी गेली वीस वर्षे याविषयाच्या संदर्भामध्ये जे काम केलंय, त्याच्या आधारे आपल्याला सांगतो, की माननीय सुप्रीम कोर्टाने 2010 साली कृष्णमूर्ती केसमध्ये ओबीसी आरक्षण आणि महिला आरक्षण घटनात्मक दृष्ट्या वैध ठरवलं. याची अंमलबजावणी करताना त्यांनी पुढे म्हणलं की, त्रिसूत्री केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी इम्पिरीकल डाटा तुम्ही दिला पाहिजे. अनुभवावर आधारलेली लोकसंख्या, मागासलेपण, प्रतिनिधित्व हे तुम्ही आकडेवारीच्या आधारे मांडलं, की मग हे आरक्षण तुम्हाला अंमलात आणता येईल. देवेंद्र फडणवीस सरकारने चलाखी अशी केली की, ३१ जुलैला निवडणुकीच्या तोंडावर एक अध्यादेश काढला. त्या अध्यादेशात काय म्हणलं की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं. लोकसंख्या दिलीच नाही. लोकसंख्या तुम्ही दिल्याशिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण कसं दिलं जाईल? एससी, एसटी ची लोकसंख्या दर दहा वर्षांनी जनगणना होते. 2010 साली हा निकाल आल्यानंतर आपण त्यावेळी सुप्रीम कोर्टात गेलो होतो आणि केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करावी अशी मागणी केली होती. नाशिकचे त्यावेळचे खासदार समीर भुजबळ यांनी स्वतः लोकसभेमध्ये हा ठराव मांडला. 100 खासदार त्याबाजूने उभे राहिले. आणि 2 ऑक्टोबर 2011 ला सामाजिक, आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 ही 60 वर्षानंतर पहिल्यांदा सुरू झाली. तीन वर्षात ते काम पूर्ण झालं. तो डाटा आपण दिला असता तर हा सगळा विषय 9 लाख लोकांचा तो सुटला असता. पण दरम्यान मोदी सरकार आलं, आणि गेली 7 वर्ष मोदी सरकारने हा डाटा आपल्याकडे अडकवून ठेवला आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी तो डाटा घेतला नाही आणि एवढंच नाही तर पाच वर्षांमध्ये, 60 महिन्यांमध्ये यांच्याकडे वेळ होता, हे नव्याने तयार करू शकले असते, तेही त्यांनी केलं नाही. एक थातुरमातुर अध्यादेश काढला. आणि त्या अध्यादेशाच्या आधारे हे आरक्षण टिकण्याचा प्रश्नच नव्हता असे हरी नरके म्हणाले.