वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता १० वी वर्गाचा निरोप समारंभ व स्वयंशासन दिन गुरुवारी (दि.३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थी मुहम्मद पटेल यांची निवड करण्यात आली होती. उपमुख्याध्यापिका साक्षी पाटील, पर्यवेक्षिका वैष्णवी सुरवसे व समृद्धी ख्याडे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण गायकवाड होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तात्यासाहेब शिंदे यांनी केले. प्रमुख पाहूणे अचलेरचे जगदीश सुरवसे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहशिक्षक युसूफ मुल्ला, उल्हास घुरघुरे, चंद्रमप्पा कंटे, सुरेश कांबळे, विवेकानंद पडसाळगे, इरफान मुजावर, राधाकृष्ण कोंढारे, श्रीमती महानंदा रोडगे, मंगल शिंदे, मनीषा कंटेकुर, तांबोळी, स्मिता सपाटे आदींची उपस्थिती होती. या स्वयंशासन दिनानिमित्त मुख्याध्यापक मुहम्मद पटेल, साक्षी पाटील, वैष्णवी सुरवसे, समृद्धी ख्याडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रविण गायकवाड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजश्री कांबळे तर आभार वर्षा शेळके यांनी मानले.