वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्म दिवस हा शिक्षक दिन म्हणून रविवारी (दि. ५) साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. अशोक बावगे होते. यावेळी प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. महेश मोटे, डॉ. नरसिंग कदम, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. संध्या डांगे, डॉ. विलास खडके, डॉ. अविनाश मुळे, बाबुराव कटके, प्रा. प्रकाश कुलकर्णी, डॉ. सोमनाथ बिरादार, प्रा. अनिल हेबळे, प्रा. सोमनाथ व्यवहारे, दत्तू गडवे, आनंद वाघमोडे, चंद्रकांत पुजारी, मशाक कागदी आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रा. अशोक बावगे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून त्यांच्या केलेल्या जीवन कार्याचा आढावा देवून सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नागोराव बोईनवाड यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी तर आभार डॉ. अरुण बावा यांनी मानले.