वार्तादूत -डिजिटल न्युज नेटवर्क
मुरूम येथील विद्यार्थिनी, शाहू विद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेतील कुमारी श्रेया दिनकर बिराजदार हिने नुकत्याच पार पडलेल्या वैद्यकीय चाचणी परीक्षेत ६४२ गुण घेऊन वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते शाल, बुके देवून तिचा शुक्रवारी (दि. २३) विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, भविष्यात ही अशाच पद्धतीने आपण यश संपादन करून गावचे व परिसराचे नाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये उज्वल करावे अशा सदिच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी पालक प्रा. दिनकर बिराजदार, आई अनिता बिराजदार, शंकर स्वामी गुरुजी, आप्पाराव हाल्लीसे, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, तोरंबा येथील व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण, ज्ञानेश्वर बिराजदार, दयानंद पाटील, माजी सरपंच राजेंद्र बिराजदार, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. महेश मोटे, डॉ. राम बजगिरे, डॉ. विनायक रासुरे, डॉ. मुकूंद धुळेकर, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. अविनाश मुळे, डॉ. भिलसिंग जाधव, प्रा. अशोक बावगे, मुख्य लिपिक राजू ढगे आदींची उपस्थित होती.