वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र ऑफलाईन भरण्यास परवानगी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु ऑनलाईन फॉर्म दाखल करण्यासाठी अडचणी येत आहेत. वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने फॉर्म भरण्यास खूप वेळ लागत आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप होत होता. सर्व्हर डाऊनची ही अडचण लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने ऑफलाईन नामनिर्देशन पत्र भरण्यास परवानगी दिली आहे. यामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी ऑफलाईन नामनिर्देशन पत्र भरता येणार आहेत. तसेच शुक्रवारी (दि.२) सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असल्याचेही निवडणूक आयोगाच्या या आदेशात म्हणले आहे.
निवडणूक आयोगाचे आदेश