वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पीप्युल्स ऑलिम्पिक असोसिएशन, इंडिया, योग विज्ञान संस्था, पंजाब व माधवी चालुक्य कन्या हायस्कूल, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.२१) उमरगा येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम ऑनलाईन झाल्याने अनेक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी शाळांमधील विद्यार्थी सहभागी होऊन हे शिबीर यशस्वी झाले. सदर कार्यक्रम पीप्युल्स ऑलिम्पिक असोसिएशन, इंडिया यांनी गुगल मीट व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उमरगा येथील योगशिक्षक प्रा. श्रीकांत पाटील, पंजाबचे योगगुरु विकास कुमार यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. सकाळी ६ वाजता एक तासाचे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून या शिबीराचे कौतुक केले.भारतातील युवा पिढी शारीरिकदृष्ट्या अधिक सशक्त बनण्यासाठी योगा, प्राणायाम करणे गरजेचे असून युवा विचाराने देखील अधिक प्रगल्भ झाला पाहिजे अशा भावना प्रा. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. पीप्युल्स ऑलिम्पिक असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस महमंदरफी शेख यांनी या शिबिराचे आयोजन केले.
No Result
View All Result
error: Content is protected !!