वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सह. पतसंस्था मर्या. लोहारा या पतसंस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन राम मुसांडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ( दि.२१) झूम zoom मीट अॅप द्वारे सकाळी ११ ते २ या वेळेत आॅनलाईन घेण्यात आली. यावेळी सभासदांनी सक्रीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक विकास घोडके यांनी केले. पतसंस्था विभाजन झाल्यापासुनच्या यशस्वी वाटचालीची माहीती दिली. तसेच माजी चेअरमन व संचालक जिवन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांना वेळेवर कर्जवाटप केल्याचे सांगुन थकबाकीचे प्रमाण कमी झाल्याचे सांगीतले. विद्यमान चेअरमन राम मुसांडे यांनी सांगितले की, पतसंस्थेचे भागभांडवल चार कोटी झाले असुन ४७ लाख रु. नफा १० टक्के दराने आॅनलाईन लाभांश सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याचे सांगितले. तातडीची कर्ज मर्यादा वीस हजार ऐवजी पन्नास हजार करत असल्याचे सांगितले. पतसंस्थेच्या इमारतीचे भुमिपुजन झाले असुन अल्पावधित कामास सुरूवात करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. अहवाल वाचन व्हाईस चेअरमन सुर्यकांत पांढरे यांनी केले. सभेपुढील सर्व विषयाचे सविस्तर वाचन करून माहीती दिली. सचिव व्ही. एस. चंदनशिवे यांनी सभासदांनी आॅनलाईन विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. सर्व सभासदांचे शंका समाधान केले. सभासदांनी पतसंस्थेच्या पारदर्शक कारभाराविषयी समाधान व्यक्त करून संचालक मंडळांचे अभिनंदन केले. शेवटी संचालक दत्तात्रय पांचाळ यांनी आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने आॅनलाईन सभा संपल्याचे जाहीर केले. आॅनलाईन सभा घेण्यासाठी उस्मानाबाद डायटचे तंत्रस्नेही शिक्षक तानाजी खंडागळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सभा यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ तसेच सभासद मनोरथ भोजने, संचालक एम. एस. कलशेट्टी, लिपीक रविंद्र कोकणे, किरण दासिमे यांनी सहकार्य केले.