वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा – सुमित झिंगाडे
उमरगा बोरिवली लोहारा मार्गे सुटणारी बस योग्य पद्धतीची व चांगली सोडण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे. उमरगा आगार व्यवस्थापनाकडे हे निवेदन दिले आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, उमरगा लोहारा मार्गे बोरिवली जाणारी बस ही ग्रामीण भागातून बोरिवली या ठिकाणी जाते. ही बस लांब पल्ल्याची असतानाही कायम जुनी नादुरुस्त बस दिली जाते. अनेकवेळा प्रवाशांना बसमध्ये बिघाड झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा ही बस नादुरुस्त दिली जात असल्याने वेळेत बोरिवली पोहचत नाही. शिवाय सतत नादुरुस्त गाडी दिली जात असल्याने बसचा खडखडाट व कुठेही बंद पडत असल्याने प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. कधी ब्रेक फेल, कधी गियर नादुरुस्त तर कधी डिझेलचा तुटवडा यामुळे प्रवाशांच्या जीविताशी खेळले जात आहे.
त्यामुळे आपल्या स्तरावरून उमरगा लोहारा मार्गे बोरिवली जाणारी बस तात्काळ योग्य कंडिशन मधील बस सोडून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आले आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव, जिल्हा संघटक धनराज बिराजदार, उमरगा तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पवार, किरण सोनकांबळे, लक्ष्मण लोहार, खंडू शिंदे, गणेश सुरवसे, पदमाकर चव्हाण, मंगेश भोसले, वसंत माने, स्वप्नील गुंड, शरद जावळे, अभिजित सूर्यवंशी, लक्ष्मण पवार, सत्यजित मुसांडे, ओमकार चव्हाण, अब्बास कारभारी, विजय जाधव, अमोल बिराजदार, संजय खरूसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचेही निवेदन
उमरगा लोहारा मार्गे बोरिवलीला सुटणारी बस नादुरुस्त सोडली जात असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. उमरगा लोहारा मार्गे बोरीवलीला सुटणारी बस ही ग्रामीण भागातून चांगले उत्पन्न एसटी महामंडळाला देत आहे. यामुळे एसटी महामंडळाने योग्य व चांगल्या पद्धतीची एसटी बस सेवा प्रवाशांना द्यावी अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संघटनेच्या वतीने उमरगा आगाराचे डेपो व्यवस्थापन यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ उमरगा लोहारा मार्गे बोरिवली जाणारी बस नादुरुस्त व बिघाड सोडू नये अन्यथा वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल असे पत्र देण्यात आले आहे. या पत्रावर जिल्हाध्यक्ष अब्बास शेख, मुंबई ठाणे पालघर विभागाचे शकील शेख, महिला जिल्हाध्यक्ष मीना लोखंडे, यशवंत भुसारे, शिवकुमार स्वामी, वसीम पठाण, महेबूब पाशा सुंबेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.