वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नागरिकांना शुध्द पाणी माफक दरात मिळावे यासाठी ताई राजेंद्र कुंभार यांनी त्यांची आई कै. इंदूबाई चनबसप्पा कुंभार यांच्या स्मरणार्थ तहसील रोडवर आरओ प्लाँट उभा केला आहे. याचा शुभारंभ जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी जि.प.सदस्या मीरा माळी यांच्या हस्ते बुधवारी (दि.२६) करण्यात आले.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात सध्या वीस ते तीस रूपयाला जारची विक्री केली जाते. शहरात अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु सामान्य नागरिकांना हा दर परवडत नसल्याने शुध्द पाण्याऐवजी नगरपंचायतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. नागरिकाना शुध्द व थंड पाणी नाममात्र किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी लोहारा शहरातील कुंभार कुटुंबियानी पुढाकार घेत तहसील रोडवर आरओ प्लँट उभा केला आहे. याचा शुभारंभ जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी व माजी जिल्हा परिषद सदस्या मीरा माळी यांच्या हस्ते करण्यात आला. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर एक लिटर शुध्द पाण्याची बाटली दोन रूपये तर वीस लिटरचे जार अवघ्या पाच रूपयामध्ये देण्यात येत आहे. अवघ्या पाच रूपये किमतीत वीस लिटर शुध्द व थंड पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना या आरओ प्लँटचा फायदा होणार आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दीपक रोडगे, युवक काँग्रेस शहरध्यक्ष हरी लोखंडे, ओम कुंभार, ऋतुजा संजय कुंभार, मदन कुलकर्णी, राजेंद्र कदम, श्रीशैल्य स्वामी, लक्ष्मण रोडगे, निलकंठ कांबळे, गणेश खबोले, यशवंत भुसारे, कल्याण ढगे, बळी रोडगे, राम सगट, सुखदेव रोडगे,सिद्राम नरुणे बाजीराव भोंडवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्रीपाद कुंभार, श्रीकांत कुंभार, समर्थ कुंभार, मिनाक्षी कुंभार आदीनी पुढाकार घेतला.
No Result
View All Result
error: Content is protected !!