वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – धाराशिव – सुमित झिंगाडे
जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा सोमवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर तांदळवाडी रोड वाशीच्या प्रांगणात आयोजीत केला असून जिल्ह्यातील भाविक-भक्तांनी जास्तीत जास्त या सोहळ्याचा लाभ घ्यावे असे आवाहन जिल्हा सेवा समिती धाराशिव यांच्या वतीने कारण्यात येत आहे. वाशी शहरातील शिवाजी चौक या ठिकाणाहून भव्य-दिव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. प्रथम स्थानी कलशधारी महिला, ध्वजधारी पुरुष, विविध पथके, भजनी मंडळ सहभागी होणार आहे. जगद्गुरुश्रींचे नामघोष करत रथातुन जगद्गुरुश्रींच्या सिद्धपादुका व प्रतिमेची मिरवणूक सकाळी ८ वाजता मार्गस्थ होईल त्यात अनेक देखावे सादर केले जाणार आहेत.कार्यक्रमाच्या ठिकाणी शोभायात्रा पोहोचल्यावर तेथे प्रथम जगद्गुरूश्रींच्या सिद्ध पादुका पूजन , व त्यानंतर सामाजिक उपक्रम अंतर्गत जिल्ह्यातील सामाजिक उपक्रम अंतर्गत ५२ गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे जिल्ह्यातुन तीस ते चाळीस हजार भाविक भक्त येणार असुन त्यासाठी भव्य सभामडंप उभारण्यात आला आहे.
सभामंडपात १ हजार चौरंग गुरुपूजनासाठी सजविण्यात येणार असून किमान ४००० ‘ भक्तगण सपत्नीक पादुका पूजन करणार आहेत त्यानंतर आरती सोहळा, जगद्गुरुश्री नरेंद्रचार्य महाराज लिखित श्रीलीलामृत ग्रंथाचे एक अध्यायाचे सामूहिक पारायण ,जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या आंँनलाईन प्रवचन होणार आहे त्यानंतर भक्त दिक्षा पादुका दर्शन होणार आहे सोहळ्याची सांगता पादुकेवरती पुष्पवृष्टी करुण होईल भाविकांनी या सोहळ्यास जास्तीत जास्त संखेने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सेवा समिती च्या वतिने करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्था करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्व स्वरूप संप्रदाय जिल्हा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.