वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारत शिक्षण संस्था संचलित भारत विद्यालय उमरगा प्रशालेत प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा अमेरिका येथील न्यु जर्सी येथे कर्करोगावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. धिरज गंभीरे यांनी केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रशालेचे मुख्याध्यापक शाहुराज जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. धिरज गंभीरे यांचे शालेय शिक्षण शहरातील भारत विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी संपादन करून मेडीसिन (एम डी) मध्ये उच्च शिक्षण घेतले.
वैद्यकीय उच्च शिक्षण घेऊन पण वैद्यकीय व्यवसाय न करता स्वतःची मेडीसीन मध्ये संशोधन करण्याची आवड असल्या कारणाने त्यांनी त्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आय.आय.टी .पवई येथे व त्यानंतर झायडस या मेडीसीन कंपनीत त्यांनी रक्तातील साखरेमुळे होणाऱ्या आजारावर मात करणारे औषध तयार करण्यासाठी होणाऱ्या निर्मितीत आपला सहभाग नोंदविला. त्यानंतर त्यांना अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली. तेथील न्यु जर्सी या ठिकाणी असलेल्या ग्लोबल क्लिनिकल लीड या कर्करोगावर मेडीसीन निर्माण करणाऱ्या कंपनीने काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्या ठिकाणी ते संशोधन करत आहेत.
त्यांच्या या कार्याची माहिती प्रशालेतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांचा ही गौरव व्हावा या करीता भारत विद्यालयात त्याचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळा हे विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव देणारे उत्तम ठिकाण असुन येथील शिक्षकांनी केलेल्या अमुल्य मार्गदर्शनामुळे मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात आज काम करत आहे .
आज विविध क्षेत्रात मोठ मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे. व यातुनच आपल्याला उत्तम संशोधक मिळतील असे प्रतिपादन करून उपस्थित विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी तथा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष नितीन होळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण माने, पर्यवेक्षक विक्रांत मोरे, संजय देशमुख यांच्यासह प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्यंकट गुंजोटे यांनी तर दुधाराम क्षिरसागर यांनी आभार मानले.