Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली…. आमदार विक्रम काळे – उमरगा तालुक्यातील मुरूम येथे शिक्षक संवाद अभियान संपन्न

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून मी तीन वेळा आमदार झालो. तेव्हापासून मी सातत्याने शिक्षकांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले. आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवून विधान परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी (दि.२४) आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक संवाद अभियानाअंतर्गत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, बामुक्टाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अंकुश कदम, डॉ. विश्वास माने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीमंत भुरे, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, दत्ता चटगे, सलीम जमादार, गोविंद पाटील, पी. जी. मदने, गणेश माने, अभिजित जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.\"\"पुढे बोलताना आ. काळे म्हणाले की, आमदार आपल्या दारी ही संकल्पना प्रत्येक वाड्या वस्तीवर पोचविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीच्या काळात विद्यार्थी पटसंख्या अभावी शाळा बंद होणार नाहीत याचीही काळजी घेऊन अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडविला. जुनी पेन्शन योजना, कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या वारसांना अनुदान, शिक्षकांच्या बढतीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण व्यवस्था, वरिष्ठ महाविद्यालयातील नेट-सेटचा प्रश्न, आरसीओसीचा प्रश्न, प्राचार्यांच्या वयोमर्यादेचा व सेवानिवृत्तीच्या संदर्भातला प्रश्न आदी प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मी केल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की, स्वर्गीय वसंतराव काळे ते विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या प्रश्नाच्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याचा मी अनेक वेळा जवळून अनुभव घेतला आहे. खऱ्या अर्थाने शिक्षकांचे नेतृत्व करणारे आमदार सक्षम असून शिक्षकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम वरिष्ठ सभागृहात विविध प्रश्न मांडून ते पूर्णत्वास नेण्याचे काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी मानले. यावेळी या परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार विक्रम काळेशिक्षक संवाद अभियान
Previous Post

मराठवाड्यातील तरुणांसाठी ११ डिफेन्स अकॕडमी सुरू करणार – आ. सतीश चव्हाण – १ एप्रिल पासून माळकोंडजी पाटी (ता.औसा) येथे क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमीची सुरुवात होणार

Next Post

लोहारा शहरात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन – केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा शहरात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन - केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!