लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय माने, उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे आणि कार्यालयीन अधिक्षक किशोर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय माने यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताद्वारे ध्वजाला मानवंदना देण्यात आली व नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांचे विद्यापीठ गीत गायन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व राष्ट्रगीत गायन डॉ. रुपचंद खराडे यांनी केले. याप्रसंगी नॅक समवयक डॉ. किरण लोमटे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. वैभव पतंगे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. अतुल बिराजदार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








