Saturday, October 3, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

मुर्शदपुर येथील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी स्वखर्चाने घेतला महिला मेळावा

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील मुर्शदपुर येथील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी स्वखर्चाने महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी महिलांचा सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील मुर्शदपूर येथील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला एकत्र आल्या. त्यांनी महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपापसात वर्गणी जमा करून गावातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी महिला मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती इंगळे, कडदोरा (ता. उमरगा) येथील सरपंच सुनंदा रणखांब, होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार, मुर्शदपुरच्या उपसरपंच संगीता माने, आशा पर्यवेक्षिका संगीता क्षीरसागर, पोलीस पाटील संघाच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षा मनिषा चाकुरे, सामाजिक कार्यकर्त्या नागिनी सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिव आरती, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांच्या पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती इंगळे व सामाजिक कार्यकर्त्या नागिनी सुरवसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्त्रीयांना मार्गदर्शन करत त्यांचा आत्मसन्मान जागा केला. विविध सामाजिक प्रश्न, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित घटनांचे दाखले देत आदर्श समाज निर्मितीसाठी स्त्रियांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांचा सत्कार, सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित महीलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. यात वैष्णवी बलसुरे यांनी प्रथम, स्वाती पाटील यांनी द्वितीय तर प्रतीक्षा मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी मुर्शदपुर येथील महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन मोरे यांनी तर मुर्शदपुरच्या पोलीस पाटील तथा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या महीला आघाडी तालुकाध्यक्षा मनिषा चाकुरे यांनी आभार मानले.

\"\"
Tags: महिला दिनमहिला मेळावालोहारा
Previous Post

हणमंत रसाळ याचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

Next Post

होली है भाई होली है, बुरा ना मानो होली है\” म्हणत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

होली है भाई होली है, बुरा ना मानो होली है\" म्हणत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!